IPL 2025 : आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील 30 सामने संपले आहेत. या 30 सामन्यांच्या शेवटी दिल्ली आणि पंजाब वगळता सर्व संघांनी 6 सामने खेळले आहेत. फक्त चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने सात सामने खेळले आहेत.
अजूनही दहा संघांना प्लेऑफची समान संधी आहे. चला जाणून घेऊयात प्रत्येक संघाचं गणित
गुजरात टायटन्सने शुबमन गिलच्या नेतृत्वात 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यासह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. गुजरात टायटन्स संघाचे फक्त 8 सामने शिल्लक आहेत. जर त्यांनी 8 पैकी 4 सामने जिंकले तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील.
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने पाच सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत. जर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पुढील 9 पैकी 4 सामने जिंकले तर 16 गुणांसह प्लेऑफसाठी जवळजवळ पात्र ठरतील.
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून 8 सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी 4 सामने जिंकले तर प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्स संघाने खेळलेल्या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर उर्वरित 7 पैकी 4 सामने जिंकले तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर उर्वरित 8 पैकी 5 सामने जिंकले तर 16 गुण मिळू शकतात. तसेच टॉप 4 मध्ये स्थान पक्कं करू शकतात.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित 9 पैकी 5 सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने 6 सामन्यापैकी 2 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. राजस्थानला अजून 8 सामने खेळायचे आहेत आणि जर 6 सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित 8 पैकी 6 सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. जर हैदराबाद संघाने उर्वरित 8 सामन्यांपैकी 6 विजय नोंदवले तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाने खेळलेल्या सात पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. चेन्नईला अजून 7 सामने खेळायचे आहेत आणि 6 सामने जिंकले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:12 15-04-2025
