लांजा : कोर्ले पिंपळवाडी-प्रभानवल्ली-बनखोर कुंभारवाडी रस्त्याची चाळण

लांजा : लांजा तालुक्यातील कोर्ले पिंपळवाडी ते प्रभानवल्ली-बनखोर कुंभारवाडी रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता दुरुस्त अथवा नव्याने तयार करावा, अशी मागणी प्रभानवल्ली परिसरामधून होत आहे.

कोर्ले पिंपळवाडी ते बनखोर कुंभारवाडी रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतून तयार करण्यात आला आहे. मात्र हा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. रत्यावरील खडी निघून मोठे खड्डे पडले आहेत.

तर साईडपट्या गायब झाल्याने रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वेळीच रस्त्याची डागडुजी अथवा रस्ता नव्याने तयार न केल्यास रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्ले पिंपळवाडी ते बनखोर कुंभारवाडी रस्ता दुरुस्त किंवा नव्याने तयार करा, अशी मागणी प्रभानवल्ली परिसरातून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 23/Apr/2025