रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांसाठी येत्या गुरुवारी (दि. २४ एप्रिल) शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आंबा विक्रीची व्यवस्था केली आहे. बारामती, इंदापूर या ठिकाणी मोफत गाळे देण्याची व्यवस्थाही केली आहे. त्याबाबत सर्व शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांची सभा गुरुवारी सकाळी ११.३० वाजता बाजार समितीच्या शांतीनगर येथील मुख्यालयात स्व. गोविंदरावजी निकम सभागृहात होणार आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुरेश भिकाजी सावंत व उपसभापती सौ. स्नेहल सचिन बाईत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव पांडुरंग कदम (9403509636) किंवा मुख्यालयाशी 02352- 229010 या क्रमांकावर संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:21 23-04-2025














