चिपळूण : तालुक्यातील खेर्डी-भूरणवाडी येथे बंद घर फोडून एका चोरट्याने तब्बल ५ लाख किमतींचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकरा ते रात्री अकरा यावेळेत घडली. या चोरीचा छडा लावण्यासाठी चिपळूण पोलिसांनी केलेल्या चहूबाजूच्या तपासाअंती अवघ्या दोन तासांत एका अल्पवयीन चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेले दागिने हस्तगत केले आहेत.
याबाबत विनायक विठ्ठल खेडेकर (वय ३४, खेर्डी-भूरणवाडी) यांनी तक्रार दिली आहे. खेडेकर हे सकाळी साडे अकरा ते रात्री ११ यावेळेत कामानिमित्त घराबाहेर गेले होते, त्यावेळी त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरटा बंद घराचा दर्शनी दरवाजाच्या तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरातील कपाटाकडे लक्ष केंद्रित करून त्यातील मंगळसूत्र, ब्रेसलेट, कर्णफुले, अंगठी असा ५ लाख ३७ हजार किमतीचे दागिने लंपास केला. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विनायक खेडेकर घरात आल्यानंतर त्यांना हा चोरी घटनेचा प्रकार उघडकीस आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 16/Apr/2025
