Ladki Bahin Yojana : 8 लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये, कारण काय..? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारने गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चाही झाली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.

मात्र आता, नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना, लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच शब्दात भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ( Ladki Bahin Yojana )

खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या तब्बल ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ( Ladki Bahin Yojana )

यासंदर्भात विचारले असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “आमचे म्हणणे आहे की, यांपैकी कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्था-अर्थी काहीही संबंध नाही. कारण पंतप्रधान मोदीजी यांनी ती देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असे काही असेल, तर ही ५०० रुपयांची योजना न घेता १५०० रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा हे ऐच्छिक. हे आपण लाडक्या बहिणींवर सोपवले आहे.” ( Ladki Bahin Yojana )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 16-04-2025