संगमेश्वर : असुर्डे गावचे प्रदीप शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे गावचे सरपंच प्रदीप उर्फ बाबू शिंदे यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य नालंदा ऑर्गनायजेशनने घेत त्यांना आदर्श सरपंच म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.

आरोग्य, शिक्षण, कला, राजकीय, सामाजिक, उद्योग, कृषी, क्रीडा, पत्रकार, युवा महिला, आदर्श ग्रामपंचायत अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत कर्तृत्वान व्यक्तींना दरवर्षी नालंद ऑर्गनायजेशन पुरस्कार प्रधान करून सन्मानित करण्यात येते.

प्रदीप शिंदे कॉलेजपासून हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. ते मौजे असुर्डे गावचे सरपंच आहेत. गावचे प्रथम नागरिक म्हणून ते उत्तमपणे काम करत असल्याने ग्रामस्थ त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधानी आहेत. त्यांच्या कामाची दखल नालंदा ऑर्गनायजेशन या राज्यस्तरीय संस्थेने घेत त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारसाठी निवड केली. संस्थेकडून पुरस्कार जाहीर केल्याचे अधिकृत पत्र त्यांना पाठवले आहे.

१९ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे डॉ. शेषराव हिम्मतराव पाटील आय.एफ. एस अधिकारी, जितेंद्र दाते चेअरमन अं.आर.जे ग्रुप, मनोज शिवाजी वाबळे अध्यक्ष शब्दधन सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या शाश्वत शेती मार्गदर्शन कार्यशाळा व महाराष्ट्र रत्न सन्माम सोहळा आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 16/Apr/2025