रातांब्याच्या उत्पादनात घट

पावस : आंबा-काजू पिकांप्रमाणे वातावरणातील बदलांचा परिणाम सलग दोन वर्षे कोकम उत्पादनावर झाला आहे. रातांब्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. त्याचा फटका प्रक्रिया पदार्थांच्या किमतीवर दिसून येत आहे. प्रक्रियेसाठी आवश्यक रातांबे पूर्वी २८ ते ३० रुपये किलोने घेतले जात होते. ते आता ४८ ते ५० रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर कोकमची लागवड आहे.

कोकणात पिकणाऱ्या प्रत्येक फळ पिकापासून प्रक्रिया करून विविध उत्पादने घेतली जातात. त्यामध्ये हापूस आंबा, काजू, राांबा म्हणजेच कोकम यांचा समावेश आहे. कोकमच्या प्रत्येक घटकाचा वापर करून पदार्थ बनवण्यात येतात. त्याचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो. कोकमच्या सालीपासून आमसुले, गरापासून कोकम सरबत, बियांचा उपयोग रोलासाठी केला जातो. कोकम आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे असून, ते औषधीही आहे. त्या पदार्थाना भरपूर मागणी आहे. या उत्पादनावर कोकणातील अनेक कुटुंबांची उपजीविका चालते. अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत.

कोकम उत्पादन हे सर्वसाधारण एप्रिल महिन्यात सुरू होते. यावर्षी अजून एप्रिल महिना संपत आला तरी काही ठराविक ठिकाणीच कोकमच्या झाडाला किरकोळ प्रमाणात फळे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी ३० ते ४० टक्केच फळधारणा होईल, अशी शक्यता आहे. यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल तसेच यंदा पीक मे महिन्याच्या अखेरीस येईल, असे चित्र आहे. गेल्या वर्षी सुमारे ६० टक्केच उत्पादन आले होते. एका बागायतदाराने दिलेल्या माहितीनुसार, प्रक्रियेसाठी दरवर्षी ४०० बॅरल (एक बॅरलमध्ये ४० किलो रातांब) रातांबे आवश्यक असतात; मात्र गतवर्षी अवघे १०५ बॅरलच रातांबे मिळाले होते. यंदाही जवळपास अशीच स्थिती आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला फटका बसणार आहे.

उत्पादन घटण्याची कारणे
कोकमसाठी उष्ण आणि दमट हवामान मानवते, रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते; मात्र त्यामध्ये ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी झाडे निपजतात. त्यामुळे लागवड केल्यानंतर ५० टक्के झाडांपासूनच किफायतशीर उत्पादन मिळते. वातावरणबदलाचा परिणाम सर्वच फळांवर होत आहे. तसा कोकमावरही झाला आहे. कोकमची नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे असतात. त्यावर एकाचवेळी फुले आली तर परागीभवन व्यवस्थित होते. त्यामधून चांगले उत्पादन मिळते. एको झाडाला उशिरा फुले आली तर मात्र उत्पादन घटते. हे चित्र गेली दोन या दिसत आहे तसेच कोकमची लागवड सर्वसाधारणपणे पाणवठ्याजवळ केली जाते. गेल्या काही वर्षाव पाणवठे उन्हाळ्यापूवींच कोण्ड बडत पडत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चरवेलीजवळ हे चित्र दिसते आहे. पाणी न मिळाल्यानेही उत्पादनावर परिणाम होत आहे, असे संशोधकांनी सांगितले.

प्रतिवर्षी १४० किलो उत्पादन
कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘कोकण अमृता’ या पूर्ण वाढलेल्या झाडापासून १४० किलो फळे प्रतिवर्ष मिळतात, फळे मध्यम आकाराची, जाड सहलीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळ्यापूर्वी पिकात त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही तसेच ‘कोकण हातीस’ झाडापासून १५० किलो फळे प्रतिवर्ष मिळतात. या जातीची पाळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात, मोठ्या आकाराच्या फळांमुळे या जातीला मागणी जास्त आहे.

२५ एप्रिलनंतर कोकम उपलब्ध
रत्नागिरी तालुक्यामध्ये हापूस आंबा व काजूसारखी कोकमची लागवड नाही. काही ठराविक ठिकाणीच त्याची लागवड टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये सुमारे ५० ते ५५ हेक्टरमध्येच कोकमची लागवड आहे व त्यातूनच मोठ्या प्रमाणात उत्पन्न शेतकरी घेत आहेत. या संदर्भात त्नागिरीतील योजक असोसिएटचे आनंद भिडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, दरवर्षी आम्ही तीनशे ते चारराने टन राांबा खरेदी करतो. प्रक्रिया वाहन विविध पदार्थ तयार करतो असतो, यावर्षी २५ एप्रिलनंतर कोकम उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. आम्हाला कोकम देणाऱ्यांची संख्या महत्त्वाची आहे. त्यातूनच प्रक्रिया उद्योग चालतो. खात्रीशीर वस्तु लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य होते.

वातावरणातील बदलांचा परिणाम हा सर्वच फळांवर होत आहे. कोकम उत्पादनाची स्थिती वेगळी नाही. २०२२ मध्ये जेवढे उत्पादन होते तेवढे २०२४ मध्ये मिळालेले नाही. यंदाही तशीच परिस्थिती आहे. कोकम झाडाला फुले येण्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे उत्पाद‌नात घट झाली आहे. – डॉ. किरण मालशे, संशोधक, भाटये नारळ संशोधन केंद्र

दरवर्षी कोकमवर प्रक्रिया करून अनेक प्रकारची उत्पादने तयार करून बाजारात विक्रीस पाठवतो. एप्रिलमध्ये बऱ्याच अंशी काम सुरू झालेले असते; परंतु यावर्षी कोकमचे उत्पादन कमी असल्यामुळे काही किरकोळ ठिकाणीच फळे दिसत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट निश्चित आहे. – मिलिंद बेहेरे, कोकम उत्पादक व विक्रेते

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 18/Apr/2025