खेड : झाडांच्या कुंड्यांना पाणी घातल्याच्या रागातून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण

खेड : घराचे बांधावर ठेवलेल्या झाडांच्या कुंड्यांना पाणी घातले याचा राग मनात धरून शिवीगाळ करत चार जणांनी दोघांना रॉड ने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २२ एप्रिल रोजी सकाळी ०९.३० वा. चे सुमारास खेड शिवतर रोड, रोहिदासनगर येथे घडली या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात एक महिला, सागर सुरेश खेडेकर, सुयोग सुरेश खेडेकर, एक महिला सर्व रा. खेड, शिवतर रोड, रोहिदास नगर ता. खेड अशी गुन्हा दाखल झालेल्या चार जणांची नावे आहेत तर या प्रकरणी प्रथमेश चंद्रकांत गिम्हवणेकर वय-३४ वर्षे, व्यवसाय-एम.एस.सी.बी. कॉन्ट्रक्टर, रा. खेड, शिवतर रोड, रोहिदास नगर यांनी तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी यांचे घराचे बांधावर ठेवलेल्या झाडांच्या कुंड्यांना पाणी घातले याचा राग मनात धरुन एका महिलेने विनाकारण शिवीगाळी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी याने महिलेस सकाळी सकाळी शिवीगाळ करु नका असे सांगितले असता त्यावेळी सागर खेडेकर याने त्याचे घरातुन लोखंडी रॉड आणुन कुंड्या फोडुन नुकसान केले व तो लोखंडी रॉड फिर्यादी यांच्या कठड्यावरील झाडांच्या कुंड्या फोडुन नुकसान केले व लोखंडी रॉड फिर्यादी यांचे डोक्यात मारुन दुखापत केलेली आहे.

सदरवेळी फिर्यादी यांची बहिण ही सोडवासोडव करण्यास आली असता तिचे डावे हाताचे पंजावर लोखंडी रॉड मारुन दुखापत केली. तसेच फिर्यादी यांचे कुटुंबियाला व फिर्यादी यांची बहिण शर्मिला बुधकर हिस शिवीगाळी, दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी दिली या मारहाणीत प्रथमेश चंद्रकांत गिम्हवणेकर वय-३४ वर्षे. २) शर्मिला सचिन बुधकर वय-३९ वर्षे दोन्ही रा. खेड, शिवतर रोड, रोहिदास नगर हे जखमी झाले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 24/Apr/2025