जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडतर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथील डॉ. मधुरा जाधव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आजच्या धावत्या युगात विशेष करून महिला व मुलींनी आपली काळजी कशी घ्यावी, तसेच मुलींना समाजात वावरताना उद्भवणाऱ्या समस्यांपासून सावध करण्यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी, महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 10/Oct/2024
