चिपळूण : ‘बॉल बॅडमिंटन’मध्ये पोफळी प्रशालेचे यश

चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेने यश मिळविले.

या स्पर्धेमध्ये १४ वर्षे मुलांच्या गटात अर्णव शेलार, १४ वर्षांखालील मुलींच्या गटात अवनी शिंदे व अनन्या जाधव यांनी यश मिळविले. या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली. स्पर्धेमध्ये १४ वर्षे मुलांच्या संघाने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. या संघामध्ये अर्णव शेलार, वेद देशमुख, ओम शिर्के, गौरांग सावंत, साईराज खरात, प्रतीक गुळवे या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक व समुपदेशक यादव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे प्रशालेचे मुख्याध्यापक सोळुंके, शिक्षक, कर्मचारी, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 10/Oct/2024