चिपळूण : वाशिष्ठी नदीतील गाळ मोफत घेऊन जाण्याचे आवाहन

रत्नागिरी : चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतून काढलेला गाळ ज्या शेतकऱ्यांना, नागरिकांना वैयक्तिक शेतीसाठी, कारणासाठी हवा आहे, अशांनी चिपळूणच्या तहसीलदारांची परवानगी घेऊन मोफत घेऊन जावे, असे आवाहन पालकमंत्री डाॅ. उदय सामंत यांनी केले आहे.

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. सामंत यांनी नुकताच आढावा घेतला. चिपळूण शहराला पुराचा त्रास होऊ नये यासाठी नाम फाउंडेशन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतून गाळ काढण्यात आला आहे. अजूनही काढण्यात येत आहे. हा काढलेला नदीतील गाळ ज्या शेतकऱ्यांना शेतकामासाठी वा ज्या नागरिकांना भर म्हणून वैयक्तिक कामासाठी हवा आहे, त्यांनी तहसीलदारांची यांची परवानगी घेऊन तो मोफत घेऊन जावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 05-05-2025