रत्नागिरी : बैल आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : धावत्या दुचाकीसमोर बैल आडवा आल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जमखी दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेल्यास किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शुक्रवार, २ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास शिरगाव ते साखरतर या रस्त्यावरील नंदाई गार्डनसमोर घडला.

सिकंदर हुसैन बंदरकर (वय ४२, रा. साखरतर रहेबर मोहल्ला, रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्याचा मित्र सलिम हसनमियाँ मस्तान (३३, रा. साखरतर रहेबर मोहल्ला, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली.

शुक्रवारी रात्री ८.५० च्या सुमारास सलिम मस्तान आणि त्याचा मित्र सिकंदर बंदरकर हे दोघे दुचाकीवरून गाडीतळ ते शिरगावमार्गे साखरतर असे जात होते. ते नंदाई गार्डनसमोर आले असता त्यांच्या दुचाकीसमोर अचानक एक बैल आला. यामुळे सिकंदरचा दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे त्याने त्या बैलाला जोराची धडक दिली. यात सिकंदरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सलिमला किरकोळ दुखापत झाली. शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 05/May/2025