राजापूर : राजापूर तालुक्यातील कशेळी गावांमध्ये लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर सुरू झाला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी काशिनाथ हळदणकर यांच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने वासरू पकडल्याची घटना घडली.
कशेळी परिसरात गेली महिनाभर बिबट्याचा वावर आहे. रात्रीच्या वेळी वस्तीमध्ये येत कुत्रे, मांजरे पळवीत होता. आता मात्र त्यांनी जनावरांवर झडप घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भीती पसरली आहे. शिवाय रात्री कार्यक्रम वा अन्य कारणासाठी बाहेर जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे दर्शन होत आहे. शिवाय जंगलमय भागामध्येही दिवसा बिबट्या दिसत आहे. दि. १ मे रोजी रात्री ३ वाजता शेतकरी काशिनाथ गोकुळ हळदणकर यांच्या गोठ्यातील वासरू विबट्याने मारले. यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 07/May/2025














