राजापूर : वडीलोपार्जित सामाईक घराच्या वादातून चुलता आणि पुतण्यांनी मारहाण केल्याची तक्रार चंद्रकांत विठ्ठल कोतावडेकर यांनी राजापूर पोलिसांत केली आहे. त्यानुसार पोलिसांनी धोंडु बाबू कोतावडेकर, विकास कोतावडेकर, यशवंत कोतावडेकर, कोतावडेकर (सर्व वसंत रा. चुनाकोळवण, निवखोलवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी चंद्रकांत कोतावडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, निवखोलवाडी येथील वडीलोपार्जित घराच्या एका बाजूला कुटुंबासह स्वतः तर दुसऱ्या बाजूला धोंडु कोतावडेकर राहतात. शनिवार ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास चंद्रकात गुरांना चारा घालण्यासाठी गेले असता धोंडु व त्यांचा मुलगा यशवंत यांनी चंद्रकांत यांना घराच्या ओटीमध्ये असलेले सामान बाहेर काढण्यास सांगितले. सामान बाहेत काढण्यास नकार दिल्याने त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली, यावेळी त्यांची पत्नी चंद्रकला व मुलगा चंदन सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही या चौघांनी मारहाण केल्याचे चंद्रकांत यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:52 18-09-2024