रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन डळाने नव्या वर्षात एसटीची भाडेवाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीमुळे लाल परी मालामाल झाली आहे अन् उत्पन्नातही चांगली वाढ झाली आहे. दररोज दीड ते दोन लाखांची उत्पनात भर पडली आहे. एकंदरीत, तीन महिन्यात तब्बल १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न रत्नागिरी आगाराला मिळाले आहे.
राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख मात्र डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किमती वाढल्यामुळे तसेच इतर कारणांमुळे एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या सेवांमध्ये २५ जानेवारी २०२५ पासून तब्बल १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली. यामुळ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली, प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. काही संघटना, पक्षांनी भाडेवाढ मागे घ्यावी यासाठी आंदोलनेही केली होती मात्र त्याला न जुमानता भाडेवाढ आहे.
तशीच ठेवण्यात आली. भाडेवाढ केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ९ डेपो मिळून आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. पूर्वी दिवसाला ९ लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता त्यात वाढ होवून तब्बल ११ लाख झाले आहे. भाडेवाढ केल्यामुळे दररोज दीड ते २ लाखांचे उत्पन्न वाढले आहे. जवळ अंतरावरील प्रवास केल्यास १० ते २५ रूपयांचा तर लांब पल्याच्या गाडीत प्रवास केल्यास तब्बल ५० ते १५० रूपयापर्यंत भाडेवाढ झाली आहे. एकंदरीत भाडेवाढ केल्यामुळे एसटीची मालामाल झाली मात्र प्रवाशांची ओरड मात्र सुरूच असल्याचे चित्र आहे.
दरवाढ केल्यामुळे प्रवासी संख्या घटली
एसटी बसेसच्या तिकीटात १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. त्यामुळे काही प्रमाणात एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात आले. लांब पल्ल्याच्या गाडीत विशेषता संख्या कमी झाली असून त्याची जागा खासगी ट्रॅव्हल्सने घेतली आहे.
परिवहन मंडळाच्यावतीने नव्या वर्षात भाडेवाढ करण्यात आली. यामुळे रत्नागिरी आगाराला मोठा फायदा झाला आहे. दिवसाला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. –बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 PM 09/May/2025
