मंडणगड : वेळास येथील समुद्री कासवांचे कासव संग्रालय तयार करण्यासंदर्भातील कासव संग्रहालय कसे असावे याचे पुर्ण मॉडेल येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव हेमंत सालदूरकर यांनी प्रोजेक्ट रुपाने तयार केले आहे. नुकतेच श्री. सालदूरकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेवून त्यांच्याकडे हे प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केले.
ऑलिव्ह रिडले या जातीच्या दुर्मिळ समुद्री कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक या गावात येतात. यामुळे मिळालेले कासवांचे गाव ही नवीन ओळख आणखी पुढे नेण्यासाठी येथे जागतिक दर्जाचे कासव संग्रहालय उभे करण्यात यावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थ आग्रही आहेत.
वेळास गावाचा समुद्र किनारा देशातील पहिला कासव संरक्षित किनारा म्हणून ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यालगतची ग्रामपंचायतीचे ताब्यातील चौदा एकर जागेची या प्रकल्पसाठी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात योग्य ती कार्यवाही सुरु करण्याचे खासदार श्री. तटकरे यांनी यावेळी आश्वासन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 09/May/2025
