संगमेश्वर : कोंडगाव बाजारपेठेत साठ हजाराची चोरी

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाजारपेठेतील स्मिता जितेंद्र शेडे वय ४२ यांच्या राहत्या घरी काल रात्री चोरी झाली. घरातील साठ हजार रुपये चोरीला गेल्याचे सांगण्यात आले असून ही चोरी रात्री अकरा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरी झाली. यावेळी घरातील माणसे बाजारपेठेत गरब्यासाठी गेले होते गरबा पाहून स्मिता शेडे रात्री घरी आल्या असता घरात चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले.

घरातील साठ हजार रुपये रोख कपाट फोडून चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांना कळविण्यात आले. याबाबतची खबर पोलिसांना मिळताच साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वैभव नटे, प्रताप सकपाळ यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचरण करण्यात आले. अधिक तपास पोलीस अधिकारी शबनम मुजावर करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 10/Oct/2024