गुहागर : पडवे गावात शांतता कमिटीची सभा सलोख्याच्या वातावरणात संपन्न

आबलोली : गुहागर तालुक्यातील पडवे गावात निर्मल ग्रामपंचायत पडवे यांच्या वतीने शांतता कमिटीची सभा अत्यंत उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात संपन्न झाली.

पडवे उर्दू शाळा येथे आयोजित या सभेला डिवायएसपी श्री. राजमाने (रत्नागिरी) आणि गुहागर पोलिस निरीक्षक श्री. सचिन सावंत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या सभेची सुरुवात ग्रामपंचायत सरपंच श्री. मुजीब जांभारकर यांनी आलेल्या मान्यवरांचे या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर गुहागरचे पोलिस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महत्वाची भूमिका मांडताना ‘पडवे गावाकडून पोलिस प्रशासनाला नेहमीच चांगले सहकार्य मिळत आले आहे. दोन्ही समाजाने एकमेकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन शांतता राखावी असा मौलिक संदेश पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी दिला.

तर प्रमुख वक्ते डिवायएसपी श्री. राजमाने- चिपळूण यांनी आपल्या मनोगतात गावाच्या निसर्ग संपन्नतेच कौतुक करत ‘पडवे गावात येण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. आज तो योग जुळून आला आहे असे सांगून मच्छीमारीव्यतिरिक्त जर पर्यटनपूरक व्यवसाय उभारले गेले, तर नव्या पिढीला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. किरकोळ वाद हे संवादा अभावी निर्माण होतात. गावात शांतता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि आंम्ही पोलिस प्रशासन म्हणून विकासात्मक कार्याला कायम सहकार्य करत राहू असा शब्द डिवाएसपी श्री. राजमाने (रत्नागिरी) यांनी दिला.

तर सरपंच श्री. मुजीब जांभारकर यांनी स्वागत करताना सांगितले की, ‘गावातील हिंदू समाजाकडून ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी नेहमीच सकारात्मक सहकार्य लाभत आले आहे. भविष्यातही हिंदू-मुस्लिम समाजात कोणत्याही प्रकारचा गैरसमज झाला, तर आम्ही पुढाकार घेऊन एकोपा टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहोत.’

या सभेला उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांमध्ये बिट अंमलदार तडवी साहेब, श्री. मकबूल जांभारकर, मुस्तर खले, पोलिस पाटील अनंत गांधी, पराग कोळवणकर, सुमेध सुर्वे, अमजद खले, नजीर जांभारकर, अमानत जांभारकर, संतोष गडदे, विनायक मयेकर, वसंत राऊत, विलास सुर्वे ग्रामपंचायत कर्मचारी ओंकार गडदे, नईम माखणकर आदींचा समावेश होता.सभेचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शवकत जांभारकर यांनी केले, तर माजी उपसरपंच श्री. सुजेंद्र सुर्वे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 10-05-2025