रत्नागिरी : तालुक्यातील बसणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा झेंडा फडकला आहे. बसणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समृद्धी समाधान मयेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
समृद्धी मयेकर सरपंचपदी बिनविरोध विजयी झाल्यानंतर तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती विभांजली पाटील, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, वैभव पाटील, उपविभागप्रमुख अमित धांगडे, नंदकुमार कदम, शाखाप्रमुख समीर हेदवकर, माजी सरपंच साक्षी झगडे, आस्था धांगडे, उपसरपंच किशोर नेवरेकर, सदस्य मानसी पाष्टे, लुंबिनी कदम, महेश नेवरेकर, मोहन धांगडे, माजी सरपंच अनिल मयेकर, अजय मयेकर, समाधान मयेकर, अनंत मयेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 10-05-2025
