रत्नागिरी : पूर्वी वीज बील भरण्यासाठी रांगेत उभे राहून वीज भरावे लागत होते. तसेच घरातील वीज गेली, किंवा परिसरातील वीजखांब कोसळला किंवा वाहिन्या तुटल्या यासह विविध तक्रारीसाठी महावितरणच्या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. यावर आता य सर्वांवर तोडगा म्हणून महावितरणाच्या वतीने ग्राहकाच्या सोयीसाठी महावितरण अॅप आणले आहे. आता ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन वीज बील भरता येणार आहे. तसेच जुने, नवीन बिल पाहणे यासह विविध कामे याच अॅपवर करता येणार आहे.
रत्नागिरीकर या महावितरण अॅपचा वापर करून वील बील भरणे, वीज खंडीत तक्रार करणे यासाठी करत आहेत. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण विभाग आता डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. त्याला रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
विशेषता उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वीज गेली असता तक्रार करण्यासाठी या महावितरणच्या अॅपचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आता महावितरण कार्यालयात पायपीट करावी लागत नाही घरात बसूनच वीज बील व इतर तक्रारी करता येत आहे.
प्ले स्टोअरमधून महावितरण अॅप डाऊनलोड करून सुरूवातीला तुमची माहिती भरून घ्यावी त्यानंतर महावितरण अॅप वापरण्यास सुरूवात होईल. अॅपमधून वीजबील, पूर्वीचे बील, मिटर रिडींग, मॅप यासह विविध माहिती आपणास मिळेल तसेच महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देवू शकता. अशा प्रकारे या अॅपचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन ही करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 12/May/2025
