देवरूख : राष्ट्रसेविका समिती, दक्षिण रत्नागिरीच्या ५ दिवसाच्या निवासी प्रारंभिक वर्गाचा सांगता अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, देवरुख येथे झाली. या वर्गामध्ये दक्षिण व उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून ५८ बालिका सहभागी झाल्या होत्या. या वर्गाची मध्यवर्ती कल्पना ‘जय जननी जय पुण्य धरा’ ही होती. या निवासी वर्गात मनगटाच्या बळकटपणासाठी काठी, लेझीम, यष्टी, योगासने इ. प्रकारांबरोबर मनः शक्तीच्या वाढीसाठी विविध महत्वपूर्ण विषयांवरील चर्चासत्र व कार्यशाळा घेण्यात आली. प्राथमिक वर्गाचे उद्घाटन राष्ट्रसेविका समितीच्या वर्गाधिकारी सुनंदा आमशेकर, गोवा यांच्याहस्ते झाला.
या वर्गात विविध खेळ व कार्यशाळा, बौद्धिक चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, शारीरिक व्यायाम, स्वसंरक्षण, मनोरंजन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कागदी फुले, आकर्षक चित्रे, रांगोळी अशा कलाकृतींची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. देशभक्तीपर समूहगीते, प्रार्थना व श्लोक, योगासने व सूर्य नमस्कार, पारंपरिक बैठे व मैदानी खेळ प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 12/May/2025
