चिपळूण : ‘चला नदीला वाचवूया’ असे ब्रीदवाक्य घेऊन चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने पद्मावती नदीतील गाळ उपसा उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. नाम फाऊंडेशन व गावातील ग्रामस्थांचा सहभाग यातून निधी उभारुन हा उपक्रम हाती घेण्यात आला असून वझर ते घाणेकरवाडी या दरम्यान, हा गाळ उपसा करण्यात येत आहे.
मार्गताम्हाने गावची पद्मावती नदी पूर्णतः गाळाने भरल्याने त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी व भविष्यात पाणीटंचाई भासू नये, पाणी पातळी वाढावी, यासाठी हा गाळ उपसा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नाम फाऊंडेशन ६० टक्के तर लोकसहभाग ४० टक्के यातून निधी उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे मार्गताम्हाने गावातील सर्व वाड्या यामध्ये सहभागी असून मोठ्या प्रमाणात आर्थिक हातभार लागला आहे. तसेच गावातील माजी आमदार मधुकर चव्हाण, डॉ. विनय नातू, माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण, उद्योजक नीलेश चव्हाण या दानशूरांचे मोठे आर्थिक सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभाला माजी आमदार नातू पद्मावती देवस्थानचे अध्यक्ष संदीप चव्हाण, नाम फाऊंडेशनचे समीर जानवळकर, माजी सभापती नीलम गोंधळी, स्नेहल चव्हाण, मानकरी विलास चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, अजित साळवी, सौरभ चव्हाण, प्रभाकर चव्हाण, जनार्दन चव्हाण, सुनील चव्हाण, सुधाकर चव्हाण, अनिल चव्हाण, संतोष चव्हाण, रवींद्र चव्हाण, सचिन चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण, पोलीस पाटील पंकज चव्हाण, कृष्णकांत चव्हाण, यशवंत चव्हाण, प्रवीण चव्हाण नंदकुमार सावंत, वसंत गोंधळी गुरव, संतोष गुरव, विनय गोंधळेकर, मार्गताम्हाने खुर्दचे ग्रामस्थ अशोक चव्हाण, प्रताप सुर्वे, राजेंद्र विचारे, प्रदीप कदम, सुजीत चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 12/May/2025
