नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’, त्यानंतर पाकिस्तानने केलेली आगळीक, त्यांना भारतीय लष्कराने दिलेला दणका आणि अखेर दोघांनी सहमतीने घेतलेला युद्धविरामाचा निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ अड्डे नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. परंतु अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन अण्वस्त्रधारी देश शस्त्रसंधीकडे वळले आहेत. पाकिस्तान नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आला आहे, परंतु भारत त्यास जशासतसे प्रत्यूत्तर देत आला आहे. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्धविरामाबद्दल ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:35 12-05-2025
