12 वीचा निकाला लागून अवघे काही दिवस उलटत असतानाच आज (13मे) इयत्ता 10वीचा निकालही जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली 10वीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 या कालावधीत पार पडली.
त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांतच 10वीचा निकाल लागला असून त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता अखेर शमली आहे. राज्यातील एकूण निकाल 94.10 टक्के लागला असून नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. सर्व विभागात कोकणने बाजी मारली असून कोकणचा एकूण निकाल 98.82 टक्के इतका लागला आहे. तर नागपूर विभागाच निकाल सर्वात कमी, म्हणजेच 90.78टक्के इतका लागला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 13-05-2025
