राजापूर : पहलगामच्या खो-यात धर्म विचारून, अत्यंत निर्दयीपणे भारतीय हिंदुंच्या कुर हत्या करण्यात आल्या.
या भारतीय सार्वभौमत्वावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत सरकार आणि तीनही दलाचे सैन्य घेत आहेत. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी, सरकार आणि लष्करी सैन्य त्यांचे कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतांना आपणही आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून राष्ट्र रक्षणासाठी, तसेच देशातील हितशत्रुचे समुळ उच्चाटन व्हावे आणि देशाच्या सीमेवरती लढणा-या आपल्या सैनिकी जवानांना विजयासाठी बल प्राप्त व्हावे, त्याचसोबत समस्त देशवासियांची संकल्प शक्ती भारतीय लष्करी सैन्याच्या पाठीशी उभी रहावी, यासाठी शनिवार राजापुरा सामूहिक हनुमान चालीसा पठण व महाआरती करण्यात आली.
शहरातील समर्थ नगर येथील श्री मारुती मंदिरात हनुमान चालीसा पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादामुळे सध्या भारताचे शत्रुराष्ट्र पाकिस्तानशी युद्धजन्य परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपानंतर भारतीय सरकारने युध्दबंदीची घोषणा केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या हद्दीतील श्रीनगर याठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. पाकिस्तानची हि जुनी खोड आहे. विश्वासघातकी पाकिस्तान कधीही सुधारणार नाही, त्यामुळे, श्री हनुमंताची शक्ती सैनिकांना मिळावी म्हणून संकल्प करुन सर्व राष्ट्रप्रेमींच्या वतीने एक तास राष्ट्रासाठी या अंतर्गत हा उपक्रम करण्यात आला.
प्रारंभी विनोद गादिकर यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगितला. यामध्ये श्री विवेक गुरव यानी सपत्नीक हा संकल्प केला. गंगाधर नवरे गुरुजी यांनी यासाठी संकल्प सांगितला. या हनुमान चालीसा पठणाला आणि महाआरती उपक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जयंत अभ्यंकर, विवेक गादिकर, मोहन घुमे, एकनाथ मोंडे, अजित गुरव, दिलीप गोखले, महेश मयेकर, रमेश गुणे, शिल्पा मराठे, गौरी अभ्यंकर, अमोल मांडवकर, मुकेश नाचरे, अनंत रानडे, निकेश पांचाळ, बाळा जोशी इत्यादी अनेक राष्ट्रप्रेमी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी सर्वांनी लष्करातील सैन्याच्या जवानांना सीमेवरती लढण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य मिळावे यासाठी प्रार्थना करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 13/May/2025
