रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रसाद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या युवासेना रत्नागिरी तालुका अधिकारी पदावर संदेश नारगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आज तालुका कार्यकारणी बैठकीत जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि रत्नागिरी तालुका संपर्क प्रमुख मंगेश साळवी यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, रविंद्र डोळस, युवासेना सह सचिव प्रद्द्युम्न माने, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत, उप तालुका प्रमुख सुभाष पावसकर, सुभाष रहाटे, विजय देसाई, विभाग प्रमुख मयूरेश्वर पाटील, किरण तोडणकर, वैभव पाटील, नयन साळवी, उत्तम मोरे, शशिकांत बारगोडे, युवासेना शहर अधिकारी आशिष चव्हाण, महिला उप जिल्हा संघटक ममता जोशी, विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार यांच्यासह इतर महिला पदाधिकारी तसेच उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 13-05-2025
