पायाभूत सुविधांसह रोजगार निर्मितीचे ध्येय : मंत्री योगेश कदम

मंडणगड : मतदारसंघामध्ये मंडणगड तालुक्यात पायाभूत सुविधांसह तरुणांना नोकरी, रोजगार आणि व्यवसायाला चालना देणारे उद्योगधंदे आगामी काळात उभारणार आहे. त्यातून या तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीचे ध्येय ठेवले ठेवले असल्याचे प्रतिपादन गृहराज्य मंत्री आमदार योगेश कदम यांनी केले.

गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या शिफारशीने व युवा सेना तालुका संघटक व आंबवणे खुर्द ग्रामस्थ विकास पवार यांच्या पाठपुराव्याने मोजे आंबवणे खुर्द गाववाडी येथे मंजूर झालेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी कदम पुढे म्हणाले, तालुक्यामध्ये विविध विकास कमांचे उ‌द्घाटन सुरू आहेत मात्र तालुक्यात पायाभूत सुविधांसह तालुक्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे व्यवसाय, उद्योगधंदे उभारणीसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने तालुक्यामध्ये ८०० एकर जमिनीवर औद्योगिक वसाहत निर्मितीचा संकल्प केलेला आहे. आगामी काळात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्या माध्यमातून स्थानिक तरुणांना हाताला काम देऊन रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार म्हणून पाच वर्षांमध्ये विविध पायाभूत सुविधा उभारण्यामध्ये लक्ष केंद्रित केले होते मात्र आता मंत्री म्हणून राज्याची जबाबदारी सांभाळताना मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमास मंडणगड तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, महिला समन्वयक स्मिता केंद्रे, विभागप्रमुख संजय शेडगे, युवासेना तालुका संघटक विकास पवार, देव्हारे संघटक नीलेश रक्ते, संघटिका दीप्ती घडशी, संघटिका सेजल गोबळे, अनंत केंद्रे, सिद्धेश देशपांडे, निलेश मोरे, सतीश पडसी, रंजीता कोळे तसेच मोजे आंबवणे खुर्द, मुंबई अध्यक्ष विजय खांब, ग्रामीण अध्यक्ष राजाराम कुळे, युवासेना शाखाधिकारी संदीप येलवे, उपशाखा अधिकारी सुधीर कुळे तसेच आंबवणे खुर्द मुंबई व ग्रामीण ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 13/May/2025