रत्नागिरी : महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट) बंधनकारक केली आहे. नवीन नियमानुसार, आता जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वाहनांना उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची कार्यवाही येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू झाली आहे. आतापर्यंत १५ टक्के वाहनांना नवीन नंबरप्लेट बसविण्यात आली आहे. तर ३३ टक्के वाहनधारकांनी यासाठी बुकिंग केले आहे.
महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट) बंधनकारक केली आहे. नवीन नियमानुसार, आता जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वाहनांना उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची कार्यवाही येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू झाली आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या (HSRP नसलेल्या) एकूण वाहनांची संख्या २,११,४२३ इतकी आहे. त्यापैकी आतापर्यंत HSRP बसविण्यासाठी ६९,२४० वाहनांची नोंदणी केली आहे. त्यापैकी ३२,२५४ वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्यात आली आहे.
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीची
वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसविणे महाराष्ट्र सरकारकडून सक्तीचे करण्यात आले आहे.
प्लेट बसवण्यासाठी अंतिम मुदत काय?
प्रारंभी शासनाने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. नंतर ती ३० एप्रिलपर्यंत वाढवली. आता पुन्हा ३० जूनपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे.
जिल्ह्यात २७ फिटमेंट सेंटर
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना एचएसआरपी बसविणे सक्तीचे करण्यात आले असल्याने त्याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कार्यवाही सुरू आहे. यासाठी जिल्ह्यात २७ फिटमेंट सेंटर्स असून या सेंटरवर ऑनलाइन बुकिंग करावे लागते.
२०१९ पूर्वीच्या वाहनांची संख्या लाख ११ हजार २४३ इतकी आहे त्यापैकी या नंबरप्लेटसाठी ६९,२४० वाहनांनी बुकिंग केले आहे. त्यापैकी १४ मेपर्यंत ३२,२५४ वाहनांना एचआरएसपी बसविण्यात आली आहे. ही नंबरप्लेट बसविण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवली आहे-राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:52 PM 16/May/2025
