कुवारबाव रेल्वे स्टेशन येथे भंगार गोळा करणाऱ्या वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : कुवारबाव रेल्वे स्टेशन येथे भंगार गोळा करणारा बिहारी प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मनोजकुमार श्रीलखन महातो (वय ४५, रा. रेल्वे स्टेशन, कुवारबाव, रत्नागिरी, मूळ- बेलवाडी-मैसाल, बदलामपूर, जि. कटीयाल, राज्य बिहार) असे त्यांचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोजकुमार महातो हे कुवारबाव रेल्वे स्टेशन परिसरात एका पडक्या इमारतीत राहायचे. रेल्वे स्टेशन येथील प्लास्टिक बाटल्या, भंगार विकून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. गुरुवारी त्यांचा सहकारी राजू महादेव दास याला ते त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पडक्या इमारतीत बेशुद्धावस्थेत आढळले. याबाबत कुवारबाव पोलिसांना याची खबर दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले व महातो यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 11-10-2024