बेईमानी करणाऱ्या गद्दारांना जागा दाखवू : आ. राजन साळवी

राजापूर : ज्यांना शिवसेनेने काही कर्तृत्व नसताना मानाच्या पदावर बसवले त्यांनी स्वार्थासाठी पक्षाशी बेईमानी केली, त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार कोंढेतड येथील शिवसैनिक, ग्रामस्थ यांनी आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीमध्ये केला.

या वेळी शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी ‘स्वार्थासाठी कोणी इमान विकले तरी विजय आपलाच आहे’, असा विश्वास आमदार साळवी यांना दिला.

शहरानजीकच्या कोंढेतड येथे झालेल्या शिवसैनिक, ग्रामस्थ यांची आमदार साळवी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख कमलाकर कदम, उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, दिलीप चव्हाण, प्रकाश कातकर, सुभाष नवाळे, शाखाप्रमुख संतोष कोत्रे, नरेश लांजेकर, गंजेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप लांजेकर, किसन लांजेकर आदीसह शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी आमदार साळवी यांनीही शिवसैनिक, कार्यकतें, पदाधिकारी, ग्रामस्थ यांना वांना मार्गदर्शन करताना आतापासून विधानसभेच्या मतदानाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी पक्ष संघटना आणि आगामी विधानसभा निवडणुका या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी कोंढेतड येथील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अन्य पक्षामध्ये नुकत्याच केलेल्या पक्षप्रवेशाबाबत या बैठकीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्वार्थासाठी ज्यांनी इमान विकले त्यांना त्यांची जागा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळवून देत दाखवण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला, कोंढेतड येथे निष्ठावंत शिवसैनिक अद्यापही कार्यरत असून, सारेजण शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या वेळी मंगेश कोत्रे, हरिश्चंद्र नवाळे, रवीकांत कोत्रे, मनोहर वाघाटे, महादेव कोत्रे, संदीप कोत्रे, सान्वी नवाळे, वीणा कोत्रे, वैशाली नवाळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 11/Oct/2024