पावस : रत्नागिरी तालुक्यातील चांदोर तळीवाडी येथील संदीप नारायण फटकरे यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्यामुळे व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पण पंधरा दिवस उलटले तरी अद्याप अहवाल प्राप्त झाला नसल्याने त्यांचे कुटुंबीय अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
फटकरे यांचा मृत्यू पंधरा दिवसांपूर्वी झाला. ते वडापाव व्यावसायिक असून, त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना पावस येथील खासगी डॉक्टरकडे आणण्यात आले. त्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यास सांगितले; परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी नेले आणि रात्री पुन्हा श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले होते; कोणीतरी घातपात केला असावा, असा संशय परिसरामध्ये व्यक्त करण्यात आला होता.
त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाचे महत्वाचे भाग तपासणीसाठी लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले जेणेकरून मृत्यूचे कारण कोणते आहे हे समजेल; परंतु पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 12/Oct/2024