रत्नागिरीतील अन्न-औषध विभागात २ पदे रिक्त

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील ग्राहकांना चांगले अन्न व औषध मिळावे तसेच निकृष्ट अन्न विक्री करण्यावर चाप राहावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग काम करते. या विभागात कित्येक वर्षापासून पदे रिक्त होती. त्यामुळे इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भार पडत होता. अखेर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे विभागाला चार नवे कर्मचारी, अधिकारी मिळाले आहेत. अद्यापही एक औषध अधिकारी, एक सहायक आयुक्तपदाची जागा रिक्तच आहे. जिल्ह्याला स्वतंत्र सहायक आयुक्तपद भरावे, अशी मागणी होत आहे.

अन्न व औषध विभागाचे मुख्य काम म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या अन्नाची आणि औषधांची गुणवत्ता तपासणे तसेच सुरक्षितता सुनिश्चित करणे, तसेच विविध दुकाने, औषध विक्रेत्यांना परवाने देणे, औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी करणे त्याचबरोबर लोकांना अन्न व औषधांच्या सुरक्षिततेबद्दलच्या आणि योग्य वापराविषयी माहिती देणे हे प्रामुख्याने काम असते.

तसेच भेसळयुक्त अन्न किंवा बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असते. यासाठी भरारी पथके, टिमची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व औषध विभागाच्या सहायक आयुक्तांना दोन जिल्ह्याचा पदभार दिलेला असतो. त्यामुळे त्या अधिकाऱ्याची कसरत असते. त्यामुळे स्वतंत्र जिल्ह्यासाठी एक सहायक आयुक्ताची नेमणूक होणे गरजेचे आहे. तसेच आतापर्यंत कर्मचारी नसल्यामुळे कामात सुसूत्रतता येत नव्हती. अखेर चार नवे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अद्याप दोन पदे रिक्त आहेत. ती पदे लवकर भरावी अशी मागणी होत आहे.

ऑनलाईन प्रणालीमुळे आतापर्यंत १७ हजार परवाने
पूर्वी एखाद्याला औषध व विविध दुकानांचा परवाना काढायचे म्हटले तर खूप वेळ लागत होता. केवळ ३५०० हजार इतके परवाने दिले होते. मात्र सहायक आयुक्त शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर विभागात ऑनलाईन प्रणाली सुरू केली. आतापर्यंत १६ हजार ७०० परवाने काढून देण्यात आले आहेत.

औषध, मिठाई, विविध हॉटेल्समध्ये तपासणी गरजेची
रत्नागिरी शहर जिल्ह्यातील नागरिकांना चांगले अन्न व औषध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन काम करते. दरम्यान, मिठाई दुकाने, हॉटेलमधील स्वच्छता, वापरले जाणारे तेल यासह बनणारे अन्न याची तपासणी होणे गरजेची आहे. तसेच बनावट औषध, इक्स्पायरी डेट संपूनही औषध विक्री होतेय का, याचीही तपासणी करावी, अशी मागणी नागरिक, संघटना करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 18/Jun/2025