साखरप्यामधील निखिल जामसंडेकर यांची ३०० किल्ल्यांची यशस्वी सफर

रत्नागिरी : जिल्ह्यातील साखरपा मधील निखिल जामसंडेकर या दुर्गवेड्या तरुणाने तब्बल ३०० किल्ल्यांची सफर पूर्ण करत इतिहास घडवला आहे. पोस्ट खात्यात मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून काम करत असताना, आपल्या सुट्यांचा सदुपयोग करत निखिलने अनेक किल्ले, शिखरे आणि जंगल सफारींमध्ये भाग घेतला आहे. २३व्या वर्षी किल्लेभ्रमंतीला सुरुवात केली आणि आजपर्यंत ३०० हून अधिक किल्ले सर केले आहेत.

महाराष्ट्रातील कलावंतीण दुर्ग, कळसुबाई, साल्हेर, सालोटा यांसारखे अती कठीण समजले जाणारे किल्लेही त्याने यशस्वीपणे पार केले. इतिहास विषयात बी.ए. पदवी घेतलेला निखिल किल्ल्यांवरील अभ्यास व संदर्भ ग्रंथ वाचत असतो. आपल्या छंदात त्याला दुर्ग सेवक प्रणव मापुस्कर, प्रशांत वैद्य, नरेंद्र जाधव, भाई गांधी यांचे सतत मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

संगमेश्वरातील प्रचितगड, मुगगड, विजापुरा यांसारख्या दुर्गम व धोकादायक किल्ल्यांचीही त्याने यशस्वी मोहिम केली आहे. केवळ ३०० किल्ल्यांवर थांबता, राज्यातील सर्व किल्ले सर करणारच, असा निर्धार निखिलने व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 01/Aug/2025