रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश मांडवकर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीच्या अध्यक्षपदी राजापूर तालुक्यातील कुणबी समाजाचे अग्रणी युवा नेतृत्व तथा राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश भिकू मांडवकर यांची बहुमताने निवड झाली आहे.

कोकणातील पाच जिल्ह्यांतील कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्नती संघाच्या अधिपत्याखाली त्या त्या जिल्ह्यांमध्ये मातृसंस्था आणि तालुका शाखा ग्रामिीण समितीमध्ये समन्वय राखण्याचे काम कुणबी समन्वय समिती करते. रत्नागिरी जिल्हा कुणबी समन्वय समितीचे काम अधिक जोमाने व्हावे याकरिता रत्नागिरीत समन्वय समितीची बैठक संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी पाच वर्षांकरिता जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये श्री. मांडवकर यांची निवड झाली.

संघ सरचिटणीस कृष्णा वणे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्षपदाकरिता समाज नेते सुरेश भायजे, प्रकाश मांडवकर व वसंत घडशी यांनी इच्छुक असल्याचे सांगितले. चर्चेअंती वसंत घडशी यांनी माघार घेतल्याने श्री. भायजे व श्री. मांडवकर यांच्यात निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपस्थित ५४ सदस्यांनी मतदान केले. यावेळी श्री. मांडवकर यांना ३९ तर श्री. भायजे यांना १५ मते मिळाली. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ही प्रकिया पार पडली.

यावेळी उर्वरित कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. ती अशी – उपाध्यक्ष वसंत घडशी (लांजा), नागेश धाडवे (खेड), शरद्चंद्र गीते (रत्नागिरी), रवींद्र घाग (दापोली), सरचिटणीस – नितीन लोकम (संगमेश्वर), सहचिटणीस – श्रीकांत मांडवकर (रत्नागिरी(, रवींद्र कुळे (गुहागर), श्रीकांत राघव (राजापूर), संदीप खामकर, खजिनदार – सुधीर वैराग (खेड).

बैठकीला शामराव पेजे न्यासाचे अध्यक्ष अॅड. सुजित झिमण, रत्नागिरी शाखाध्यक्ष रामभाऊ गराटे, हुमणे गुरुजी, प्रदीप बेंडल, पांडुरंग पाते, दीपक शिगवण, शंकर बाईत, विनायक शिवगण, सूर्यकांत गोताड, गजानन धनावडे, संघाच्या राजापूर ग्रामीण समितीचे अध्यक्ष दीपक नागले, सुरेश बाईत, चंद्रकांत जानस्कर, रमेश सूद, मुंबईचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर यांच्यासह संघ पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 12-08-2025