रत्नागिरी : सापुचेतळे (ता. लांजा) येथे चिरेखाणीवर चिरे काढण्याच्या इलेक्ट्रिक मशीनचा शॉक लागून तरुण जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या सुमारास सापुचेतळे येथे घडली. रत्नेश लाखण ठाकूर (वय २७, रा. सापुचेतळे, ता. लांजा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुण रत्नेश ठाकूर हा महेंद्र चव्हाण यांच्या चिरेखाणीवर काम करत होता. त्यांच्या सोबत सुनील गौंड, रामरतन गौड (सर्व रा. मध्यप्रदेश) हे देखील होते. सोमवारी सकाळी रत्नेश ठाकूर कामावरील चिरेखाणची इलेक्ट्रिक आडा मशीन चिरे काढत होता.
मशिनच्या इलेक्ट्रिक वायरला उजव्या हाताने पकडून बाजूला केले असता त्याला जोरदार शॉक लागला. तत्काळ त्याला उपचारासाठी सापुचेतळे येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिसचौकीत नोंद केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 12/Aug/2025












