चिपळूण : दलवाई हायस्कूल प्राथमिक विभागात रानभाज्या प्रदर्शन उत्साहात

चिपळूण : मिरजोळी दलवाई हायस्कूलमध्ये आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा पार पडल्या. यावेळी १२ पालकांनी कटलेट, पकोडे, थालिपीठ, भाजी-भाकरी पाककृती सादर केल्या. उद्घाटन मंगेश चव्हाण, स्वागत मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी केले. माध्यमिक विभागातील इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी, तर इयत्ता २री ते ४थीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. पाककला स्पर्धेत प्रथम ऋतुजा सागवेकर, द्वितीय काव्या आंब्रे, तृतीय क्रमांक रिया बने यांनी पटकावले.

यावेळी स्कूल कमिटी चेअरमन खालीद दलवाई, संस्था सचिव जहीर दलवाई, सहसचिव राजेश जाधव, उपाध्यक्षा रिया बने, मंगेश चव्हाण, मुख्याध्यापिका मयुरी तटकरे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रेरणा मोहिते, आभार प्रदर्शन नेहा मेस्त्री यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 12/Aug/2025