रत्नागिरी : शासनातर्फे कृषी विभागाच्या विविध योजना राबविताना ‘लकी ड्रॉ’ पद्धतीचा अवलंब केला जात होता. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा अर्ज करावे लागत असत. लकी ड्रॉ पद्धत बंद करून पहिला अर्ज करणार त्याला लाभ या पद्धतीला प्राधान्य दिले आहे.
शेतकऱ्यांच्या अशा आहेत महत्त्वाच्या योजना
पीकविमा योजना, सिंचन सुधारणा योजना, शेतकरी कर्ज सुविधा, शेतीबाबत अनुदान, आधुनिक यांत्रिक अवजारे, साधने उपलब्ध करून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
अशी होती आधीची लकी ड्रॉ योजना
पूर्वी शेतकऱ्यांच्या योजना मिळविण्यासाठी अनेकदा अर्ज पुन्हा पुन्हा करावे लागत होते. वारंवार अर्ज करून लाभ न मिळाल्यास शेतकरी निराश होत असत.
अवघ्या ३५ ते ५० टक्के शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ
लकी ड्रॉ पद्धतीमुळे फक्त ३० ते ५० टक्के शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ मिळत असे, उर्वरित शेतकऱ्यांना योजना मिळवणे शक्य होत नसे.
पुन्हा काढावी लागायची सोडत
अनेक शेतकरी अनुदान किंवा लाभ मिळण्यासाठी अनेकदा अपयशी ठरत होते. वारंवार अर्ज करण्याच्या या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम वाया जात असे.
आता प्रथमला प्राधान्याचे धोरण
शासनाने आता प्रथम अर्ज करणाऱ्याला प्राधान्य असे धोरण राबविण्याचे निश्चित केले आहे.
नव्या धोरणाचा असा होणार फायदा
शासनाने प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रक्रिया पारदर्शी, जलद, सुलभ होणार आहे. शेतकरी आश्वस्त होणार आहेत.
अधिक परिणामकारक
शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि योजना अधिक परिणामकारक ठरतील. या बदलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल व ते योजनांचा अधिक फायदा घेऊ शकणार आहेत.
लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून नव्या धोरणाचा लाभ घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना आपली माहिती, जमीन व पीक तपशील अचूक भरावा. योग्य माहिती भरल्यास योजना सहजपणे मिळू शकते. पोर्टलवर अर्ज केल्याने, शेतकरी त्याचा लाभ वेळेत व सुरक्षितपणे घेऊ शकतात. न्याय पद्धतीने योजनांचे वितरण होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 20/Aug/2025












