Rajapur : पाचल-दिवाळवाडी रस्त्याला भगदाड

राजापूर : पाचल-दिवाळवाडी येथील दिवाळवाडी मुख्य रस्ता ते स्मशानभूमी-बौद्धवाडी-मुस्लिमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला पावसाच्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधितांनी तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे या भागामध्ये जमिनीला तडे जाऊन रस्ता खचला. ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ या ठिकाणी मोठे दगड टाकले आहेत; मात्र पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते देखील वाहून गेले आहेत. हा रस्ता शेतकरी बांधव स्मशानभूमीकडे जाण्यासाठी, गावमंदिराकडे आणि प्रामुख्याने गणेश विसर्जन घाटाकडे जाण्यासाठी वापरतात. रस्त्याची सद्यःस्थिती पाहता या रस्त्यावरून वाहने ये-जा करणे शक्य नाही. त्यामुळे संबंधित विभागाने गणेश विसर्जनाआधी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 28-Aug-25