रत्नागिरी : संस्कृत भारतीतर्फे रत्नागिरी शहरात पाच ठिकाणी २२ सप्टेंबरपासून गीतापठण वर्गांची सुरुवात होणार आहे. या वर्गामध्ये गीता म्हणायला शिकवले जाणार आहे. हा वर्ग निःशुल्क असून, यासाठी वयाची अट नाही. रत्नागिरीमध्ये आठवड्यातून दोन दिवस हे वर्ग चालविले जातील.
दर सोमवार व गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत विश्वशांती संकुल, दैवज्ञ भवनजवळ संपदा निमकर, गुरुवार व शनिवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सिद्धिविनायकनगर, शिवाजीनगर येथे किशोरी मोघे शिकवणार आहेत. मंगळवार व बुधवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत गजानन महाराज मंदिर, नाचणे रस्ता येथे अमृता आपटे, सोमवार आणि गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ घाणेकर आळीत चिन्मयी सरपोतदार आणि खेर संकुल, टिळक आळी येथे मंजिरी आगाशे शिकवणार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन संस्कृतभारतीतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 17/Sep/2025












