रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळावा २७ सप्टेंबर रोजी

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दुष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचे आयोजन २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे.

मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थाकडील विविध २ हजार ५०० पेक्षा अधिक पदांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी त्यांचे ५ बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार कार्यालयाशी त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी (०२३५२) २२२४१४ या क्रंमाकावर संपर्क करावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत गणपत कोतवडेकर केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 21-09-2024