चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे पक्षफुटीनंतर प्रथमच चिपळूणमध्ये येत आहेत. सोमवार, दि. २३ रोजी सकाळी ११ वाजता बहादूरशेख चौक येथील स्वा. सावरकर मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारीच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूणमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करण्याचे टाळले, त्यामुळे शरद पवार या सभेचा कसा समाचार घेणार, जिल्हावासीयांचे लागून राहिले आहे. याकडे लक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे. शहरात ‘मी येतोय…’ असे फलक आणि झेंडे लावण्यात आले आहेत. या दौऱ्यात ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना उबाठा व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा करणार आहेत. सोमवारी सकाळी ९:३० वा. ते बहादूरशेख चौक येथील भारतरत्न डॉ. बाचासाहेब आंबेडकर व त्यानंतर सांस्कृतीक केंद्राजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतील. त्यानंतर विविध संघटना पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या जातील. सकाळी ११ वा. जाहीर सभा होईल. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या सभेत शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोणती टीका करतात या बाबत उत्सुकता आहे. या प्रचार सभेच्यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने चिपळूण-संगमेश्वरमधून प्रशांत यादव यांची उमेदवारी जाहीर होते का? या बाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रशांत यांनी मतदारसंघात जोरदार दौरा केला आहे आणि संपर्क बाढविला आहे. पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी अंतर्गत दोन गट निर्माण झाल्याने शरद पवार गटाबरोबर माजी आ. रमेश कदम राहिले आणि त्यांनी प्रशांत यादव यांना उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. त्यामुळे या सभेत यादव यांची उमेदवारी जाहीर होते का? या बाबत उत्सुकता आहे. प्रचारसभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून सुमारे बारा हजार लोक या सभेला येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपासमोर गॅलरी उभारण्यात आली असून पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या सभेला चिपळूण, संगमेश्वरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशांत यादव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 23/Sep/2024
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰