रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी आज रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री नितीन दत्तात्रय बगाटे यांची भेट घेऊन महिलांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिरासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या प्रसंगी महिला मोर्चाच्या सौ. प्राजक्ता रूमडे, सौ. नपुरा मुळे, सौ. कामना बेग, सौ. भक्ती दळी तसेच इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
या भेटीत सौ. वर्षा ढेकणे यांनी शिबिराचे उद्दिष्ट, महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या सेवा तसेच शिबिराचे नियोजन याची माहिती दिली. त्यावर श्री. बगाटे साहेबांनी या उपक्रमाचे स्वागत करत शिबिरासाठी परवानगी दिली तसेच जिल्ह्यातील सर्व हेडक्वार्टरमध्येही अशा प्रकारची महिला आरोग्य शिबिरे आयोजित करावीत अशी सूचना दिली
महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि सक्षमीकरणासाठी हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून महिला मोर्चाच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:16 07-10-2025














