Rajapur : तळवडेतील ‘जल हे विश्व’ला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

पाचल : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे आणि रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्यावतीने अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प लाभ क्षेत्रातील शेतकरीवर्गासाठी पाण्याचे नियोजन आणि त्याचा लाभ याबाबत लोककला आणि लोकनृत्य यावर प्रबोधनात्मक ‘जल हे विश्व’ हा कार्यक्रम नुकताच तळवडे येथे शेतक-यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी पाटबंधारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार, उपअभियंता नावलीकर, सहाय्यक अभियंता श्रेणी २ चे अविनाश कुंभोजकर, बनसोडे, तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी, पाचलचे सरपंच बाबालाल फरास, परुळे गावच्या सरपंच रजनी सावंत, ताम्हाणेच्या सरपंच समिक्षा वाफेलकर, तळवडे पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष संदीप बारस्कर, पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर, विभाग प्रमुख (उबाठा) विलास नारकर, भाजपचे राजापूर पूर्व विभाग उपाध्यक्ष प्रदीप गांधी, समाजसेवक आप्पा साळवी, बाबा सावंत, सुनिल जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम सादरीकरण आरती क्रिएशन्स छत्रपती संभाजी नगर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 18/Oct/2025