रत्नागिरी : थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने जोरदार तयारी केली आहे. मुदतीत वीज बिल न भरल्यास थकबाकीदार ग्राहकांची झोप उडविणारे फोन महावितरणच्या कॉल सेन्टरमधून येणार आहेत. त्यासाठी महावितरण राज्यातील १६ विभागांत स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करणार असून, त्यामध्ये रत्नागिरी परिमंडळाचाही समावेश आहे.
वीज थकबाकी प्रभावीपणे वसुली करण्यासाठी महावितरणने हा उपक्रम हाती घेतला आहे. वीज ग्राहकांने वेळीच वीज बिल भरावे यासाठी पाठपुरावा व त्यांना प्रोत्साहित करणेही आवश्यक आहे. त्यासाठी महावितरण आता कॉल सेंटर सुरू करणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 23-09-2024