Satara Doctor Suicide Case | डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी चिपळुणात आज कॅण्डल मार्च

चिपळूण : फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय, सीआयडी किंवा विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीकडे वर्ग करावा, या मागणीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी चिपळूण शहरात कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे.

या आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) तसेच वुमन्स डॉक्टर्स विंग यांच्यावतीने करण्यात आले आहे. हा कॅण्डल मार्च सायंकाळी ६ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. शुक्रवारच्या कॅण्डल मार्चमध्ये सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, महिला आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. कांचन मदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, आरोग्य विभाग चिपळूण, आयएमए वूमन डॉक्टर्स विंग यांच्यावतीने या कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 31/Oct/2025