Mandangad : तळेघर ग्रामस्थांचे उपोषण मागे

मंडणगड : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तळेघर गावातील तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी बुधवारपासून (ता. २९) सुरू केलेले साखळी उपोषण अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी सुनील खरात आणि ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंता जवादे यांनी चर्चेवेळी ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार, कामातील त्रुटींबाबत मक्तेदाराला नोटीस देण्यात आली असून त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 31/Oct/2025