Kavi Keshavsut Smarak Malgund : मालगुंड येथील केशवसुत स्मारकात आज कवी संमेलन

गणपतीपुळे : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कवी केशवसुत स्मारक स्मारक मालगुंड या ठिकाणी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. कोकण मराठी साहित्य परिषदेचे दिवंगत विश्वस्त अरुण अच्युत नेरुरकर यांना श्रद्धांजली व त्यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आदींची प्रमुख उपस्थिती, तर कोमसापचे विश्वस्त रेखा नार्वेकर, प्राध्यापक एल. बी. पाटील, अनुप कर्णिक आदींची विशेष उपस्थिती तसेच कोमसापचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, उरण शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, रायगड जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या विशेष कार्यक्रमाला कोमसापपेक्षा सदस्यांनी आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसापचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक आनंद शेलार, युवाशक्ती प्रमुख दक्षिण कोकण अरुण मौर्ये, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 06/Nov/2025