रत्नागिरी : जिल्ह्यात ५ उमेदवारांची ७ नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात चौथ्या दिवशी तीन मतदार संघात ५ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी दाखल झालेल्या विधानसभा मतदार संघनिहाय नामनिर्देशन पत्रांची माहिती पुढीलप्रमाणे..
265- चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये अनघा राजेश कांगणे – अपक्ष आणि महेंद्र जयराम पवार – अपक्ष यांनी प्रत्येकी 1 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
266- रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये उदय रविंद्र सामंत – शिवसेना यांनी 3 आणि ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष यांनी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.
267- राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये अविनाश शांताराम लाड – इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी त्यांचे सूचक प्रदीप यशवंत गुरव आणि प्रतिनिधी महेंद्र नलावडे यांच्यामार्फत 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 26-10-2024