रत्नागिरी : आसाम राज्यातील प्रौढाचा रत्नागिरीतील मिरजोळे येथे आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. धीरेश्वर गिरीन ब्रम्हा (वय ५४, मूळ रा. काटाजहर ता. गोवर्धन जि. बक्सा, आसाम सध्या राहणार एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. धीरेश्वर ब्रम्ह हा गेले दोन ते तीन दिवस ताप व थंडीने आजारी होता. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास त्याला थंडी व ताप भरुन आला. त्याने कुवारबाव येथील मेडीकलमधून औषधे घेतली व तो रुमवर आराम करत होता.
रात्री १०.३० वा. सुमारास त्याचा सहकारी आणि खबर देणार नैनेश विलास लकेश्री याने धीरेश्वरला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु धीरेश्वर कोणताच प्रतिसाद देत नसल्याने लके श्रीने त्याला तातडीने एमआयडीसी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धीरेश्वरला । तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 06/Dec/2025












