रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी अज्ञात कारणातून गवत मारण्याचे तणनाशक औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वा. मृत्यू झाला. सतीश मोहन सुर्वे (४१, रा. बागपाटोळे चांदेराई, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
सतीश रविवार, २० ऑक्टोबर रोजी आपल्या घरी साफसफाई करत होता. त्यावेळी अज्ञात कारणातून त्याने गवत मारण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी त्याला उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याने विषारी औषध प्राशन केल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वा. सुमारास उपचारांदरम्यान, सतीशचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 26/Oct/2024